आमच्याबद्दल

  • होम
  •   आमच्याबद्दल
आमच्याबद्दल

    कै. भाऊसाहेब फिरोदिया वृद्धाश्रम संस्था हि अहमदनगर मधील एक विश्वसनीय वृद्धाश्रम संस्था आहे. ह्या वृद्धाश्रम संस्थेत वृद्ध व्यक्तींना धर्म, जात, पंथ, लिंग या पुढे जाऊन माणूस म्हणून सेवा दिली जाते. अहमदनगर-औरंगाबाद रस्त्यावरील ५ एकरपेक्षा जास्त जागेत हा वृद्धाश्रम सेवा देत आहे. समाजातील सर्व घटकांमधील अनाथ, निराधार, गरीब व गरजू वृद्धांना येथे प्रवेश दिला जातो. आश्रमात प्रवेश मिळविण्यासाठी पुरुषाचे वय ६० वर्षापेक्षा जास्त आणि स्त्रिचे वय ५५ वर्षापेक्षा जास्त असावे अशी अट आहे. सन 1964 मध्ये स्वर्गीय श्री. भाऊसाहेब फिरोदिया (माजी मुंबई विधानसभा अध्यक्ष) यांनी वृद्धाश्रमाची स्थापना केली. संस्थेच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ 1973 मध्ये वृद्धाश्रमाचे नाव बदलून भाऊसाहेब फिरोदिया वृद्धाश्रम ठेवले गेले.

    समाजमंदिर, जेवणाची स्वतंत्र व्यवस्था, मनोरंजनाकरिता टीव्ही, गरम पाण्याची २४ तास सोया, दवाखाना अश्या सोयींसोबतच शारीरिक स्वास्थ्याकरिता व मानसिक आनंदाकरिता येथे विविध उपक्रम देखील राबविले जातात. आर्थिकदृष्ट्या सक्षम वृद्धांना मासिक सहयोग राशी भरून देखील प्रवेश मिळविता येतो. या विभागात काही अटी व शर्तीवर प्रवेश देण्यात येतो.येथे राहण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. पूज्य आचार्य आनंदऋषीजी, परमपूज्य माननीय श्री. रामचंद्र शास्त्री डोंगरे महाराज, भारतरत्न संत मदत तेरेसा यांनी येथे चालणारे मानवसेवेचे कार्य पाहून आनंद व समाधान व्यक्त केले होते. ज्या वृद्धव्यक्तींना काही कारणास्तव घरापासून दूर राहावे लागते, अशा लोकांसाठी भाऊसाहेब फिरोदिया वृद्धाश्रम उत्तम व सुखकर जीवन जगण्याची सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. आयुष्याची सेकंड इनिंग सुकर कशी होईल हेच वृद्धाश्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.

ध्येय

जात, धर्म, पंथ, लिंग हे सर्व बाजूला ठेवून ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याची सेकंद इनिंग सुखकर कशी होईल यासाठी अविरत प्रयत्न करणे